भारत न्यूज 1 नांदेड जिल्हा प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी नायगाव तहसील कार्यालयासमोर सतिष पाटील कदम व गजानन पूर्ण कदम हिप्परगेकर हे दोन युवक बांधव आमरण उपोषणाला बसले आहेत
त्याचबरोबर वजीरगाव ता. नायगाव येथील हणमंत पाटील ढगे हे बांधव वजीरगाव ता. नायगाव या ठिकाणी उपोषणास बसले आहेत. हे तिन्ही युवक बांधव मागील पाच दिवसांपासून आमरणउपोषण करत आहेत. आज मराठा समाजाची आरक्षणाची मागणी लवकरात लवकर पूर्ण करून मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे अशी मागणी चालू असताना, याठिकाणी अशी परिस्थिती असताना, सत्ताधारी पक्षाचे,बावनकुळे नायगाव येथे सभा घेण्यासाठी येत आहेत,जो पर्यंत आरक्षण दिले जाणार नाही, तो पर्यंत कोणत्याही पक्षाच्या राजकीय लोकांना,सभा घेऊ दिली जाणार नाही।