भारत न्यूज १ रिपोर्टर योगेश लखोटे – वर्धा ( हिंगणघाट )
बंधुत्वाची बीज विद्यार्थ्याच्या मनात रुजवणे शिक्षकांसाठी एक आव्हाण झाले आहे. आधुनिकतेमुळे विद्यार्थी परिकीय संस्कृतीला बळी पडत आहे. अशावेळी चांगल्या-वाईट बांबीचे आकलन त्यांना करुन देणे ही जेवढी शिक्षकांची जबाबदारी असते. त्याहीपेक्षा जास्त पालकांची जबाबदारी असते. आदर्श शिक्षक राष्ट्राचे भवितव्य आहे असे प्रतिपादन पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टीस श्री अरुण चौधरी यांनी व्यक्त केले. ते ५ सप्टेबर शिक्षकदिना निमित्त हिंगणघाट येथील के. जी. एन. हॉल येथे किडस ब्राईट फ्युचर स्पोर्टींग क्लब द्वारा आयोजित विविध क्षेत्रातील एकवीस शिक्षकांच्या सत्कार सोहळया प्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार समीर कुणावार तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ समाजसेवक मोहनबाबू अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, ठाणेदार मारोती मुळूक, क्रिडा अधिकारी अनिल निमगडे, माजी पोलीस उपआयुक्त चंद्रकांत उदगीकर, जमील अहमद, जेष्ठ साहित्यकार इमरान राही, समाजसेवी के. आर. बजाज, राजू लभाणे, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष विजय सत्यम, सूप्रसिध्द विधीतज्ञ अँड इब्राहीम बख्श आजाद प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
इमरान राही म्हणाले की शिक्षक हे संस्काराचे प्रथम माध्यम आहे. यातूनच मूलांवर सकारात्मक भावनेचे बीजारोपण करता येऊ शकते. समीर कुणावार म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा प्रेरणादायी मूलमंत्र समाजाला देतांना प्रथम शिक्षणाला प्राधान्य दर्शविले आहे व किड्स ब्राइट फ्युचर स्पोर्टींग क्लब चे कौतुक केले, मोहन अग्रवाल म्हणाले केवळ शाळेचे शिक्षण आजच्या विद्यार्थाना पूरसे नसून शाळेबाहेरचे शिक्षणही विद्यार्थाच्या भवितव्याला कलाटणीही देणारे ठरते ही सूध्दा जाणीव शिक्षकांनी ठेवायला पाहिजे. तेव्हाच एक शिक्षक आदर्श विद्यार्थी घडविण्याला सक्षम ठरतो असे सांगीतले. यावेळी , चंद्रकांत उदगीकर, अनिल निमगडे यांनी सूध्दा मनोगत व्यक्त केले.
पाहूण्यांच्या हस्ते प्रा. बलराज उर्फ राजू अवचट, सुबोध महाबुधे सत्येन्द्र झोटींग, कॅप्टन मोहन गुजरकर, मंगेश चवडे, प्रशांत लेदाडे, डॉ विद्या राजू कळसाईत, प्राचार्य प्रिती विजय सत्यम, श्याम खेमस्कर, बी.एल. खांडरे, प्रा वैशाली पोळ, प्रविणकुमार जवादे, विलास कळंबे, मजाज कुरेशी, नितीन क्षीरसागर, अतूल झाडे, राकेश शर्मा, आशिष भोयर, ऐतबार अली, विनोद ज्ञानेश्वरराव कोसूरकर यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावाना अब्दुल कदीर बख्श, संचालन अँड इब्राहीम बख्श आजाद तर आभार अनिकेत भैसारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता, मुस्तफा बख्श, अजय बारसागडे, इरफान खान, आसिफ मलनस, अब्दुल कदीर बख्श, दामिनी राऊत, दानिश खान, नाजिश खान, व समस्त किड्स ब्राइट फ्युचर क्लब चे खेळाळू व पदाधिकारी आदी अनेकांनी अथक परिश्रम घेतले.