भारत न्यूज 1 प्रतिनिधि सोलापूर
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच आता धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. सोलापूर येथे शासकिय विश्रामगृहात हा प्रकार घडला. अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने धनगर समाजातील बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे. पण अद्याप त्यावर मार्ग निघालेला नाही. आता पालकमंत्री विखे पाटील सोलापूर दौर्यावर आहेत. आज शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी धनगर कार्यकर्ते शेखर बंगाळे यांच्या नेतृत्वाखाली काही समाज बांधव पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन द्यायला गेले होते. त्यावेळी निवेदन वाचत असताना खिशातील भंडारा काढून बंगाळे यांनी पालकमंत्री विखे पाटलांच्या अंगावर उधळत आरक्षण देण्याची घोषणा दिल्या.
यापुढे पालकमंत्र्यांना अथवा येणारे कोणत्याही सोलापुरातील मंत्र्यांना कार्यकर्ता शाई टाकू शकतो आणि इतर मार्गाने सुद्धा निषेध करू शकतो तरी पोलिसांनी कारवाई करावी भेटणारे येणाऱ्यांचे किसे तपासावे कोणताही भयंकर प्रकार झाल्यास नंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी होते तरी यापुढे मंत्र्यांची सुरक्षा वाढवावी बंगाळे या युवकाची या कृत्यामुळे कुसुम चौकशी करण्यात यावी अशी सत्ताधारी कडून मागणी होत आहे.