भारत न्यूज 1प्रतिनिधि सिंदखेडराजा
गावचा कारभार करण्यासाठी निवडलेले सरपंच उपसरपंच आणि सदस्य हे गाव कारभार नीट करतात की नाही हे पाहणे नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे त्यासाठीच ग्रामसभेचे महत्त्व आहे तसेच गावातील तंटे बखेडे गाव पातळीवर सोडवून गावात सर्वांनी सामंजस्याने रहावे यासाठी तंटामुक्ती समिती गावोगावी स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष हे एक जबाबदारीचे पद असून सिदखेडराजा तालुक्यातील शेंदुरजन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच पार पडली.
ग्रामपंचायत कार्यालय शेंदुर्जन येथे ग्रामसभा झाली असून ग्रामसभेमधे नवीन तंनटामुक्ती अध्यक्षाची नियुक्ति करण्यात आली आहे. तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून संतोष दत्तात्रेय शिंगणे यांची बिनविरोध निवड झाली. तंटामुक्ती अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर संतोष शिंगणे यांचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.