भारत न्यूज १ रिपोर्टर योगेश लखोटे -वर्धा ( हिंगणघाट )
हिंगणघाट तालुका भाजप किसान आघाडीने केली नुकसान भरपाई ची मागणी
तालुक्यातील सोयाबीन पिकांवर पिवळा मोझ्याक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती शिवारातील तात्काळ पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा तालुका किसान आघाडीच्या वतीने करण्यात आली.
आज दि.३० रोजी या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावे स्थानीक तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.हिंगणघाट तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्याचे सोयाबीन पिकांवर शेंगाच्या अवस्थेमध्ये पिवळा मोझायक या विषान्यूजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.या रोगाचे प्रादुर्भावामुळे सोयाबीन पूर्णत: करपले असून सोयाबीन पिकांवर बियाणे, पेरणी, फवारणी इत्यादीसाठी मोठा खर्च केल्यानंतरही पिक हातात येणार नाही,या रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिक संपूर्णतः नष्ट होण्याच्या अवस्थेत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला असून शासनातर्फे नुकसाभरपाईची मागणी भाजप किसान आघाडीच्या वतीने करण्यात आली.प्रशासनाचेवतीने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश शासन स्तरावर तलाठी, कृषि सहायक, ग्रामसेवक यांना देण्यात यावे. नुकसान ग्रस्त शेतक-यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी करण्यात आली.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी वर्धा तसेच हिंगणघाट, समुद्रपुर, सींदी(रेल्वे) विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांना देण्यात आल्या आहेत. सदर निवेदन भाजपा हिंगणघाट तालुका अध्यक्ष मा. आकाश पोहाणे व भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे अध्यक्ष तथा सरपंच योगेश बोंडे यांचे नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे, तालुका महामंत्री विनोद विटाळे, येनोरा येथील सरपंच योगेश बोंडे, सातेफळ येथील सरपंच शंकर मेश्राम, जांगोना येथील सरपंच नितीन वाघ, माजी सरपंच सास्ती हडस्ती विकास इंगळे, विशाल गौळकार, अमोल ठाकरे, बाबाराव ठाकरे, संदीप डेहणे, विनोद जवादे, पुंडलिक बोरकर, संदीप धोटे, प्रकाश धोटे, शैलेश पावडे, नंदकिशोर बोरकर , किशोर बोरकर, नमित जवादे, विलास मुजबैले, ज्ञानेश्वर ठाकरे, विनोद ठाकरे इत्यादी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.