भारत न्यूज 1 प्रतिनिधि खडीॅ
प्राथमिक आरोग्य केंद्र खर्डी येथे कर्मयोगी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक (मालक ) यांच्या तृतीय पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबीर व तसेच आभा कार्ड काढणे, आधार कार्डमध्ये दुरुस्ती करणे, आभा गोल्डन कार्ड काढणे इत्यादी उपक्रम आज राबविण्यात आले.या शिबिरामध्ये 262 लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी 36 मोतीबिंदू असलेले व 10 डोळ्यावर पडदा आलेले रुग्ण शोधन्यात आले. 55 लोकांचे आभा कार्ड काढण्यात आले. 25 लोकांचे आधारकार्ड दुरुस्ती करण्यात आली. आणि 161 लोकांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी खर्डी गावचे सुपुत्र चेअरमन मुकुंद परिचारक, युवा नेते मा. प्रणव परिचारक, मार्केट कमिटी संचालक महादेव लवटे, सरपंच मनीषा सवासे, उपसरपंच शरदभाऊ रोंगे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, जेष्ठ नागरिक,विविध संस्थाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी. डॉ. अस्मिता बागल , डॉ. संध्या पाटील व तसेच ए. जी. देसाई हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ. कदम, डॉ. कराडे व त्यांचे सर्व स्टाफ तसेच प्रा. आ. केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक व सर्व आशा स्वयंसेविका यांनी परिश्रम घेतले.