मूलभूत सुविधा न दिल्यास दिल्लीला धडक देऊ, मेळघाट बचाव आंदोलकांचा इशारा
मेळघाटातील चिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या हतरू ,रायपुर सालीता सुमिता बुटीदा भुत्रुम, आदी अशी तब्बल 25 गावे सध्या स्थिती ही पक्क्या रस्ते व मूलभत सुविधा पासून वंचित आहे. यामुळे येथील नागरिकांच्या जीवनमानावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. शासन सतत वन विभागाचे आड घेऊन या भागात राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा न देता एक प्रकारे अन्याय करत असल्याचा आरोप मेळघाट बचाव आंदोलन समितीचे प्रमुख भैयालाल मावसकर, महाराष्ट्र आदिवासी विकास परिषदचे प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण, रवी बेठेकर,काल्या चुथुर, यांनी धारणी येथे एक पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे. सध्या आमची लढाई ही स्थानिक स्तरावर सुरू असून राज्य सरकारचे जर डोळे उघडले नाही तर मेळघाटात जनजागृती करून थेट दिल्लीवर धडक घालू आणि केंद्र सरकारला जागे करू असेही यावेळी मेळघाट आंदोलकानी यांनी म्हटले आहे.
मेळघाट आंदोलक समितीच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे सेमाडोह ते हतरू, भुत्रुम रस्ता, डांबरीकरण, सिमेंट रोड करण्यात यावा, भुत्रुम ते धारणी,खामला ते हतरू, परसापूर ते जामली आर या रस्त्यांवर पक्का बांधकाम करून पुलाचे बांधकाम करण्यात यावे, मेळघाटातील आदिवासी बहुजन शेतकऱ्यांकरता बोरवेल, कोल्हापुरी बंधारे, बांधण्यात यावे. मेळघाटातील सर्व शेतकऱ्यांना वेळोवेळी नुकसान भरपाई देण्यात यावी. मेळघाटात विधानसभा मतदारसंघातील जनते करिता परतवाडा ते हतरु, परतवाडा ते राणीगाव, परतवाडा ते डोमा, परतवाडा ते जांभली आर इत्यादी सर्व ठिकाणी कायमस्वरूपी एस. टी. महामंडळाची बस सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात यावी, प्रकल्प अधिकारी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग प्रकल्प संचालक डी. आर.डी. ए. अंतर्गत लाभार्थ्यांना शबरी घरकुल, राशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, गाडीचे लायसन्स इत्यादी बाबत विशेष मोहीम राबवण्यात यावी, मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्रफळ मोठे असल्याने तत्काळ अचलपूर जिल्हा निर्माण करण्यात यावा. शिक्षण, आरोग्य व रोजगार बाबत अत्यंत गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. तरी या समस्या सोडवण्याकरता कायमस्वरूपी कर्मचारी, अधिकारी यांना मेळघाट मुख्यालयात राहण्याबाबत सक्तीने शासनाने निर्णय व कायदा करण्यात यावा. वन खात्याच्या अत्यंत जाचक असलेल्या अटी व शर्ती रद्द करून मेळघाटातून होणारे पुर्नवसन, तत्काळ थांबवण्यात यावे, अश्या मागण्या शासन दरबारी एका निवेदनाव्दारे मांडण्यात आल्याचे हि यावेळी सांगितले.