भारत न्यूज 1जालना प्रतिनिधि
अवैध धंद्याच्या विरोधात वालसावंगी येथिल तरुणांची पारध पोलीस ठाण्याला निवेदन
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वालसावंगी धावडासह परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्यासाठी आज येथील अनेक तरुणांनी पारध पोलीस ठाणे गाठून गावकरी यांच्या वतिने पारध ठाण्याचे सपोनि . चैनसिंग घुशिंगे व पोलीस उपनिरीक्षक विलास घुशिंगे यांना निवेदन देऊन अवैध धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी या निवेद्रनाद्वारे केली आहेतयासह भोकरदन तालुक्यातील धावडा ,पारध ,वडोदतांगडा, रेणुकाईपिंपळगाव ,वाढोणा व परिसरात अनेक ठिकाणी वरली मटकी , पत्ताचे क्लब , अवैध गुटखा ,तसेच रेती . डोंगर दरीतून चोरुन मुरूम . व चौऱ्या होत असल्याने नागरिक भयभीत झाले असुन यांच्याकडे पारध पोलीसांनी लक्ष देऊन कारवाई कराव्यात अशी मागणी या धावडा वालसावंगी परिसरातून होत आहेत तसेच अनेकांचे परिसरात देशी दारू, जुगार, मटका यांची अवैध विक्री व वृक्षतोड होत असून या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष आकर्षित करावेत यासह वालसावंगी गावातील ग्रामपंचायत कार्यालयात युवकांनी मासिक सभेत अवैध धंदे बंद करण्याची प्रतिज्ञा घेण्याचे निवेदन दिले असून दोन्ही निवेदनावर अनेक युवकांच्या सह्या आहेत.
वालसावंगी व धावडासह परिसरात सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावे नसता आम्ही पारध पोलीस ठाण्या समोर उपोषण करू .या संदर्भात पोलीस सुत्राने सांगितले की कोणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे करताना आढळून आल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल. यापूर्वीही या परिसरात अवैध धंद्याचे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.अशी माहीती पारध ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विलास घुशिंगे यांनी निवेदन प्रसंगी बोलताना माहीती दिली आहेत तरी या संदर्भाचे निवेदन जालना जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक यांना ही हे निवेदन पाठवण्यात आले आहेत तरी या निवेदनाची जालना जिल्हाचे कर्तव्यदक्ष पोलीसअधीक्षक तुषार दोंशी यांनी वालसावंगी धावडा . पारध . वडोदतांगडा पिंपळगावरेणुकाई . वाढोणा या परिसराची पाहणी करून गुप्त पद्धतीने लक्ष केंद्रित करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात केली आहेत.या ावेळी वालसावंगी येथिल राम मस्के,अमोल बोरमळे, पंकज धामोणे ,गणेश गवळी ,बालू बोरमळे ,भगवान वाघ ,राजू सपकाळ , दगडूबा बोरमळे यावेळी हजर होते.