*भारत न्यूज १ रिपोर्टर योगेश लखोटे -वर्धा ( हिंगणघाट )*
– चंद्रावर चंद्रयान नेणाऱ्या देशात रस्ताच नसल्याने प्रेत न्यावे लागते बैलबंडीवर….
-वर्धा जील्हातील हिंगणघाट तालुक्यातील वाघोली गावानजीक खैराटी पारधी बेड्यावरील प्रेताला मृता उपरांतही नरकयातना…
-रस्ताच नसल्याने रात्री रुग्णालयात नेता न आल्याने भावाचा मृत्यू झाल्याचा आरोप…
चक्क प्रेत नेले बैलबंडीवर…
वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या खैराटी पारधी बेड्यावर जाण्यासाठी रस्ताच नसल्याने… चक्क प्रेताला बैलबंडीवर न्यावे लागत असल्याने मृत्यूनंतरही प्रेतास नरक यातना सहन कराव्या लागत असल्याचा प्रकार या भागात घडतो आहे….
रस्ता नसल्याने रुग्णालयास भावाला नेऊ न शकल्याने माझ्या भावाचा मृत्यू झाला असल्याचा गंभीर आरोप देखील या वेळेस मृतकाच्या भावाने लगावलेला आहेत….
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली गावानजीक असलेल्या खैराटी पारधी बेड्यावर जाणा-येण्याकरिता रस्ताच नसल्याने मोठा त्रास पावसाळ्या दरम्यान या गावातील नागरिकांना करावा लागतो आहे… याच गावातील विनोद भोसले रात्री चिखलाच्या रस्त्यातून रुग्णालयात नेऊ न शकल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला असा आरोप मृतक विनोद भोसले यांचे भाऊ संजय भोसले यांनी लगावला आहेत… एकीकडे चंद्रावर चंद्रयान उतरवणाऱ्या भारतामध्ये हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागात रस्तेच नसल्याने चक्क प्रेत बैलबंडीवर बांधून घरी नावे लागते आहे अशी शोकांतिका आहे… यामुळे या भागातील रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे…