पंचवटी पोलीस स्टेशन ,लोक निर्णय सामाजिक संस्था आणि संविधान प्रेमी नाशिककर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वाढती गुन्हेगारी,आपला पुढाकार आणि पोलिसांची भूमिका या विषयावर पंचवटी स्तरीय जाहीर परिसंवा बौद्ध विहार, सम्राट नगर, फुले नगर, पंचवटी.नाशिक. येथे आयोजित करण्यात आला होता. सदर परिसंवादामध्ये शहरातील वाढती गुन्हेगारी बाबत लोकांशी प्रबोधन आणि पोलिसांबरोबर प्रत्यक्ष कार्य हा या परिसंवादाचा उद्देश असून संघटन सर्वत्र भागात असे कार्यक्रम घेत असल्याची प्रस्तावना किरण मोहिते यांनी केली. या परिसंवादाचे अध्यक्ष मौलाना सलीम यांनी सर्व धर्मीयांनी सर्वांचे भले होवो ही सर्व धर्मीय शिकवण जोपासल्यास आणि संविधान मूल्यांधरीत कृती केल्यास सलोखा वाढेल असे प्रतिपादन केले. या ठिकाणी उपस्थित नागरिकांचे गुन्हेगारी प्रतिबंधासाठी म्हणणे ऐकले गेले. त्यात पोलिसांनी परप्रांतीय मराठी व इतर भाषिक यांच्या तक्रारी दुर्लक्ष करू नये,मुलींच्या हरवणे तक्रारींवर वेगाने पुढाकार घेणे, रस्त्यांवर आणि चौकात वाढदिवस करणारे यांचा बंदोबस्त करणे, अल्पवयीन मुले नशेच्या आहारी गेल्याने व्यसन गुटखा, व्हाइटनर बंद करणे गुन्हेगारांना पाठीशी न घालणे, चोरीच्या घटनांना आळा घालून अवैध शस्त्र बाळगणारे यांचेवर कारवाई करणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आदी तक्रारी मानण्यात आल्या. नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करून शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून पोलिसांनी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्डवरील आणि सराईत गुन्हेगारांचा तसेच संघटित गुन्हेगारी करणारे यांचेवर एम पी डी ए,मोक्का, तडीपारी तसेच इतर प्रतिबंधक कारवाया केल्या असून आणखीन काही गुन्हेगारांवर प्रतिबंधक कार्यवाही करण्याचे काम चालू असल्याचे सांगितले. नागरिकांना माननीय पोलीस आयुक्त यांचे संकल्पनेतून सायबर क्राईम रोखण्यासाठी सायबर दूत ही संकल्पना समजावून सांगितली. नागरिकांच्या चौकाचौघात सभा घेऊन त्यांची तक्रारी जाणून घेणे व त्यांचे निरसन करणे याबाबत माहिती दिली. बाल गुन्हेगारी आणि त्यांना रोखणे करिता उपाय योजना सांगण्यात आली. डायल ११२, शांतता समितीतील सुजाण नागरिकांचा सहभाग.नाव न सांगता व्हाट्सअप नंबर द्वारे तक्रारी करण्याची सुविधा बाबत नंदन बगाडे,पोलीस निरीक्षक पंचवटी पोलीस ठाणे ने मार्गदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.