भारत न्यूज १ रिपोर्टर योगेश लखोटे-वर्धा ( हिंगणघाट )
हिंगणघाट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत मधील दिव्यांग कल्याण निधी ५% टक्के वाटप करा.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे पंचायत समिती कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत दिले निवेदन…
सात दिवसात ५% टक्के निधी वाटप करा अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन…
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्राम पंचायत मधील दिव्यांग कल्याण निधी ५% टक्के वाटप करण्यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने पंचायत समिती कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांच्या नेतृत्वात ७ जुलै रोजी ५% निधी वाटप करण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. परंतु अजुन पर्यंत त्यासंबधी दखल घेण्यात आली नसून अजूनपर्यंत निधी वाटप केला नाही.आज पंचायत समिती कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करत गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले की पंचायत समिती हिंगणघाट अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत मधील दिव्यांग निधी ५% टक्के वाटप करण्यात यावा अन्यथा ७ दिवसानंतर पंचायत समिती कार्यालय हिंगणघाट येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर,ओबीसी जिल्ह्याध्यक्ष प्रशांत घवघवे, सुनील भुते गोमाजी मोरे, गजानन महाकाळकर, सुशील घोडे, राजू मुडे, पंकज भट्ट, संतोषराव तिमांडे, गोपाळ कांबळे, सतीश गौळकर, दानिश रहीम शेख, जगदीश देवतळे, सतीश भजभूजे, भास्कर कोसुरकर, पांडुरंग बोरकर, संदीप बोरकर, सुनील बावणे , जयंत ठाकरे, मधुकर आदमने, रमेश कांबळे, मीना खोडे, राजेश्वर हुलके, गजानन मांडवकर, बाबाराव बचूने, अरविंद अलोने, मधुकर येडमे, अशोक धुर्वे, सुनीता सातपुते, देवराव वाफले, पवन कावळे, रामचंद्र सहारे, गणपत मुगले, मनोहर पाल, बाबुराव लोखंडे, नितेश जूरंगे, दिनेश मानकर आदी उपस्थित होते.