दिनांक 17 गुरुवार रोजी श्री. क्षेत्र मारुती मंदिर पळवे खुर्द येथे ह भ प. पु. वै.वासी रामदास महाराज साबळे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह भ प शिवानंद महाराज नांगरे यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ पळवे खुर्द यांच्या सहकार्याने सुरू झालेला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने झाली. आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, भजन, तुकाराम गाथा भजन, हरिपाठ, हरी किर्तन,हरी जागर, हे अखंड हरिनाम सप्ताहाचे 23 वे वर्ष होते. तसेच या ठिकाणी पहारा व चोपदार, लाईट डेकोरेशन,पार्किंग व्यवस्था, ही चोख ठेवण्यात आली होती.
तसेच या ठिकाणी पळवे खुर्द, मठ वस्ती,बाबुर्डी, पळवे बुद्रुक, वाघुंडे, म्हसणे सुलतानपूर, घाणेगाव,जातेगाव इत्यादी भजनी मंडळाचा हरिजागर झाला आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दिनांक 17 रोजी ह. भ.प. बाळकृष्ण महाराज सोनुळे (वडनेर )यांचे कीर्तन झाले आहे. दिनांक 18 शुक्रवार रोजी ह भ प प्रा. अशोक महाराज शिंदे (डिक्सळ ) यांचे कीर्तन झाले आहे. शनिवार दि. 19 रोजी ह भ प गुलाब महाराज करंजुले सर (पाडळी ) यांचे कीर्तन झाले आहे. रविवार दि. 20 रोजी ह भ प गोरख महाराज बनकर (रांजणगाव मशीद ) यांचे कीर्तन झाले आहे. सोमवार दि. 21 रोजी ह भ प सोमनाथ महाराज बारगळ सर (पळवे खुर्द) यांचे कीर्तन झाले आहे. मंगळवार दि.22 रोजी ह भ प रामेश्वर महाराज मस्के (चांडगाव ) यांचे कीर्तन झाले आहे. बुधवार दि. 23 रोजी ह भ प ज्ञानेश्वर महाराज पिंपळे (पाबळ ) यांचे कीर्तन झाले आहे. तसेच गुरुवार दिनांक 24 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत ह भ प समाधान महाराज शर्मा भागवताचार्य (केज बीड) यांचे बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत काल्याचे किर्तन झालेआहे. व नंतर पळवे खुर्द येथील शशिकांत देशमुख, विक्रांत देशमुख, रघुनाथ देशमुख, सुभाष देशमुख, शहाजी देशमुख, प्रकाश देशमुख, विनायक देशमुख, साहेबराव देशमुख, किसन देशमुख, गोरख देशमुख, शरद देशमुख, जितेंद्र देशमुख, सचिन देशमुख, सिताराम देशमुख, काशिनाथ गाडीलकर यांच्यावतीने कीर्तनकार व महाप्रसादाचे अन्नदान देण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नानाभाऊ गाडीलकर यांनी केले.