अनेक दिवसांपासुन महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल विकास परिषद या आदिवासी संघटना मधे गट बाज निर्माण होऊन दोन गट निर्माण झालेले होते आणि प्रदेश अध्यक्ष पदावरुन वाद सुरु होता यावर तोडगा निघावा या संदर्भामधे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी व संस्थापक अध्यक्ष अलीबाबा तडवी आणि इतर पदाधिकारी यांच्या तर्फे फर्दापुर विश्राम गृह येथे बैठक घेण्यात आल.
महाराष्ट्र एकलव्य आदिवासी तडवी भिल्ल विकास परिषद या आदिवासी सामाजिक संघटनामधे प्रदेश अध्यक्ष पदावरुन तक्रार दाखल करण्यात आली होती आणि अनेक दिवसांपासुन संघटनेच्या पदाधिका-यांमधे शिवसेना,राष्ट्रवादी काॕंग्रेस पक्षा प्रमाणेच दोन गट निर्माण झालेले होते त्यामुळे आदिवासी समाजाचा विकास न होता यात राजकारण होऊन समाजाचा चुराडा होत होता त्यामुळे समाजासमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता यावर तोडगा काढण्यासाठी आदिवासी समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अकबर तडवी , शरिफ तडवी, राजु तडवी, मुजाहिद सुरत्ने,महेमुद तडवी,यांनी सर्वांना एकत्रीत बोलावुन ही बैठक आयोजित करुन आप आपसातला वाद बाजुला ठेऊन या संघटनेच्या पदधिका-यांनी, एकत्र यावे आणि सर्व मिळुन आदिवासी समाजाला न्याय द्यावा चांगले मार्गदर्शन करुन समाजाचा विकास आणि समाजामधे चांगला बदल घडवुन आनावा यासाठी सोयगाव तालुक्यातील फर्दापुर विश्राम गृह येथे आदिवासी संघटना आणि पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती प्रदेश अध्यक्ष पदावरुन जो वाद सुरु आहे ती तक्रार मागे घेऊन सर्वांनी एक जुटिने सोबत राहुन आदिवासी समाजासाठी काम करावे असे या बैठकी दरम्यान ठरविण्यात आले आणि आलेल्या सर्व पदाधीकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी मान्य केले सर्वानुमते प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी हेच राहतील असे ठरविण्यात आले. अफसर तडवी त्यांच काम कार्य चांगलं धाडशी धडाडीचे आहे आणि आम्ही सर्व पदाधीकारी त्यांच्या सोबत आहे असे प्रतिपादन अलीबाबा तडवी यांनी केले गळ्यात गळा टाकुन गळाभेट भेटी घेऊन तोंडामधे पेढा भरवुन सर्वांनी आनंद साजरा केला या बैठकी दरम्यान ,प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी, संस्थापक अध्यक्ष अलीबाबा,तडवी,संघटनेचे पदाधिकारी,डाॕक्टर समीर तडवी, बाबु तडवी, नवाजखा तडवी ,सांडु तडवी,अकबर तडवी, अॕडव्होकेट रंजीत तडवी, मुजाहिद सुरत्ने,शरिफ तडवी,राजु तडवी, महेमुद तडवी,जलाल तडवी,गफुर तडवी आदी मान्यवर उपस्थित होते