गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारांनी आपले डोकं वर काढले असून गंभीर गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे.यामुळे,नाशिककर सर्वसामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर,राज्याचे कर्तव्यदक्ष गृहमंत्री मा.श्री.ना.देवेंद्रजी फडणवीस यांची आज भेट घेऊन सदर घटनेमधील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करून नाशिक शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत करावी असे निवेदन आमदार सीमा हिरे ने दिले.यावेळी मा.गृहमंत्री देवेंद्र जी यांनी याबाबत पोलीस प्रशासनासोबत बोलून गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.